काळा पाडवा (Kala Padwa)

0
62

लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदी

लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती ‘हाऊस अरेस्ट’मध्ये आहे. नैराश्य, हतबलता तर सर्वांनाच जाणवत आहे पण तरी आपल्या जगातल्या धीराच्या गोष्टी बऱ्याच चालू आहेत. त्या नोंदण्याचा हा धावता प्रयत्न. असेच काही सांगण्याची इच्छा असेल तर जरूर कळवा.
ई-मेल –
info@thinkmaharashtra.com

  
अशोक हांडे

अशोक हांडे हे फळांचे, विशेषतः आंब्याचे मोठे वितरक, व्यापारी आहेत. मराठी बाणा व अन्य वाद्यवृंदसम कार्यक्रम हा त्यांचा छंद/आवड आहे. तो स्वतंत्रपणे मोठा व्याप व व्यवहार झाला आहे, ती गोष्ट वेगळी. मार्चमध्ये येणारा गुढी पाडवा म्हणजे त्यांच्या आंब्याच्या सीझनचा आरंभ. हांडे आज मात्र उद्वेगाने म्हणाले, की हा पाडवा काळा आहे. माझ्या सदतीस वर्षांच्या व्यावसायिक आयुष्यात इतका बिकट, हतबल करून सोडणारा प्रसंग कधी आला नाही. यंदा पावसाळा लांबल्यामुळे,आंबा चांगला भरला आहे आणि तो  कैरीच्या अवस्थेला खराब होण्याचे प्रमाणही कमी होते. झाडावर भरपूर आंबा आहे. आखाती देशांतील गिऱ्हाईक आंब्याची वाट पाहत आहे आणि शेतकरी हवालदिल आहे. त्याला झाडापर्यंत जायचीदेखील बंदी आहे!

          हांडे नवीन मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये असतात. ते म्हणाले, काल जेव्हा मार्केट बंद होण्याची मीटिंग झाली, तेव्हा मी व्यापारी सहकारी, सरकारी अधिकारी, अन्य प्रशासक यांच्या त्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या जीवाचा आकांत मांडला. परंतु, कोरोना विषाणूने ग्रासलेला माणूस दुसर्‍या कोणत्याही गोष्टीचा विचार करू शकत नाही. त्याचे ध्येय सध्या एकच आहे, की त्याला कोरोनाला नष्ट करायचे आहे. तेही बरोबरच आहे. कोरोनानंतरचा आंब्याचा पुढील वर्षीचा हंगाम शेतकऱ्याला व गिऱ्हाईकाला, दोघांना आनंद देईल ही आशा. दरम्यान एपीएमसी मार्केट सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 
अशोक हांडे 9821082804 
chaurang.ashokhande@gmail.com 
 – दिनकर गांगल 9867118517
 ————————————————————————————————
अशोक हांडे यांनी शेतकऱ्यांची हतबलता मांडली. दरम्यान आनंदाची एक बातमी आली, की ‘थिंक महाराष्ट्र‘चे लेखक कार्यकर्ते राजा पटवर्धन यांनी रिकामपणाचा  सदुपयोग केला आहे.

मराठी बाणातील काही दृश्ये –

मराठी बाणातील दृश्ये

———————————————————————————————————

दिनकर गांगल


दिनकर गांगलहे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे दहा वर्षांपासून मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली म.टा.ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना फीचर रायटिंगया संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.गांगल हे ग्रंथालीप्रमाणे प्रभात चित्र मंडळाचे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here