मोसम गणेशोत्सवाचा आहे. गणपती घरी बसवणाऱ्यांकडे धामधूम चालू आहे. गणेश ही देवता आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. मराठी समाज जेथे जेथे गेला तेथे तेथे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून गणपतीला घेऊन गेला. बघता बघता गणपती अन्य समाजातही पसरला आणि आता तो केवळ भारताला बांधणाराच नव्हे तर जगाला जोडणारा देव होऊ शकतो अशी चिन्हे दिसतात. अर्थात या वर्षी कोरोनामुळे सारे जग लौकिक व्यवहारदृष्ट्या बंद आहे आणि ते मानसिक पातळीवर भरकटलेले आहे. अशा वेळी गणेशोत्सवात उत्साह राहिलेला नाही. परंतु दुसऱ्या प्रकारे, ती गणपतीची कसोटी असणार आहे, की तो साऱ्या जगाला सांभाळून कसा घेतो!
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने गणेशोत्सवासंबंधात काही वेगळे लेख वेळोवेळी प्रसिद्ध केले आहेत. त्यांची लिंक पुढे देत आहोत. वाचकांना ज्या लेखाबाबत औत्सुक्य वाटेल त्यांनी तो लेख वाचावा.
अपेक्षा अर्थातच राहिल, की त्या लेखनावर वाचकांनी भाष्य करावेच; परंतु त्याबरोबर, त्यांनी त्यांच्या आढळात आलेला वेगळा गणेशोत्सव अथवा उत्साहाबाबतचे वेगळे निरीक्षण/मत जरूर कळवावे. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध करण्यास आवडेल.
– टीम थिंक महाराष्ट्र 9892611767
————————————————————————————————————————————–