मांडवगोटा, आदिमानवाचे स्मारक (Mandavgota – In Memory of Prehistoric Humanbeing)

5
46

आदिमानव राहत होता तो सुमारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वीचा महापाषाणकाळ. त्यावेळी कोणत्याही आदिमानवाचा मृत्यू झालाकी त्याची आठवण म्हणून ज्या ठिकाणी त्याला गाडण्यात येत्या ठिकाणी फार मोठी दगडाची शिळा उभारली जात असे. तशा शिळा दिसण्या ओबडधोबड असून त्यांना काही ठिकाणी कल्पकतेने मानवी किंवा नैसर्गिक आकार देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्या भ्या रोवलेल्या दगडी शिळांना शिलास्तंभ असे म्हणतात. से शिलास्तंभ जगामध्ये अनेक ठिकाणी आहेत. त्यांना इंग्रजीत मेनहीर (Menhir) असे म्हटले जाते.से शिलास्तंभ चांदागड परिसरात भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा येथे आढळतात. तसेच शिलास्तंभ नागभीड येथील शिव टेकडीच्या पायथ्याशीही आहेत. चांदागड परिसरातील चिमुर तालुक्यातील हिरापूर गावाजवळ महापाषाण काळातील शिलाप्रकोष्ट आढळून येतात. त्या काळात सगळीकडे घनदाट जंगले होती. त्यामुळे माणूस ज्या ठिकाणी पुरला त्या जागेची आठवण ठेवणे कठीण होई. तसेच, काही ठिकाणी आदिमानवाने मोठमोठ्या शिळा एकमेकांवर रचून त्यांना घरासारखा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संशोधक त्याला शिलाप्रकोष्ट असे म्हणतात. त्याला इंग्रजीत डोलमेन (DOLMEN) असे नाव आहे. से शिलाप्रकोष्ट ब्रिटन, अमेरिका, आफ्रिका, फ्रान्स,
बल्गेरिया आणि दक्षिण कोरिया अशा इतर देशांतही पाहण्यास मिळतात. जगामध्ये सर्वाधिक शिलाप्रकोष्ट दक्षिण कोरियामध्ये आहे. तेथे जवळपास पस्तीस हजार शिलाप्रकोष्ट असावेत. ती संख्या संपूर्ण जगात असलेल्या एकूण शिलाप्रकोष्टांपैकी चाळीस टक्के आहे. युनेस्कोने त्या शिलाप्रकोष्टांना जागतिक ठेवा (World Heritage) म्हणून दर्जा दिलेला आहे. युरोपीयन देशात संशोधक त्याला बॅलंसिंग रॉक’ म्हणताततर आफ्रिकन देशांत त्यांना स्टोन टेबल’ असे म्हणतात. भारताही अनेक राज्यांत शिलास्तंभ आणि शिलाप्रकोष्ट आहेत. आंध्रप्रदेशात ते थाथीकोंडा’ आणि जानगाव’ येथे आहेतकेरळमध्ये मारायुर या गावी, कर्नाटकातील मडीकेरी येथे; तसेच, ते तामिळनाडू राज्यातही आहेत.

कचारगडची गुहा
चांदागड परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तूमंदिरेलेणीकिल्ले आणि जवळपास सात ते दहा हजार वर्षांपूर्वीच्या काही वास्तू आहेत. कचारगड येथील चार हजार वर्षांपूर्वीच्या भव्य गुहा प्रसिद्ध आहेत. आदिमानवाची वस्ती आणि त्याचे अस्तित्व याची ती साक्ष मानली जाते. चांदागडच्या बऱ्याच परिसरात झालेल्या उत्खननातूआदीमानवाचे राहणीमान, चालीरीती आणि संस्कृती यांचे दर्शन होते; तसेच, त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या संस्काराची माहिती मिळते.
आदीमानव मृत व्यक्तीच्या अस्थीचे ‌ऊनवारा आणि पा यांपासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या शिळांचे घर तयार करत असे. त्या वेळी अशी पद्धत होती, की प्रेताच्या अस्थी बाहेर काढूनत्या अस्थींना स्वच्छ धुऊन त्यांची विधिवत पूजा केली जात असे. पुन्हा त्या अस्थींना शिळांच्या घरात पुरले जाई. अशा प्रकारे, पूर्वजांचा मान-सन्मान राखला जाई. ईसवी सनपूर्व बाराव्या शतकात मांडवगोटा येथे तशी पूजा झालेली दिसते. अलिकडे झालेल्या उत्खननात संशोधकांना तांब्याची नाणी, बांगड्यांचे तुकडे सापडले. त्यावरून त्यामधील पुरलेले एक प्रेत स्त्रीचे असावे. तसेच, उत्खननात संशोधकांना सातवाहनकालीन विटा सापडलेल्या आहेत. त्या तेथे अजूनही पाहण्यास मिळतात.
चांदी येथील शिलापेटी
त्या परिसरातील रहिवासी त्याला मांडवगोटा’ म्हणतात. मांडवगोटा हा घराच्या आकाराप्रमाणे चौरस आयताकृती आहे. मांडवगोटा ही लोहपाषाणापासून तयार केलेली वास्तू आहे. त्याची लांबी तेरा फूट चार इंच असूनत्याची रुंदी जवळपास दीड फूट आहे. तसेच, उंची सहा फूट आहे. चारही बाजूंनी शिळा एकमेकांस जोडून उभ्या केलेल्या आहेत. त्या शिळांचा काही भाग जमिनीत गाडलेला दिसतो. मांडवगोट्याच्या पुढील बाजूस एक मोठी शिळा वरील तीनही शिळांना जोडलेली असून त्यामध्ये दोन आयताकृती दरवाजे केलेले आहेत. त्या मांडवगोट्याच्या मध्यभागी आडवी एक शिळा टाकून त्याचे दोन भाग केले आहेत. त्यावरून त्या ठिकाणी दोन प्रेते असावीत. त्या चारही उभ्या असलेल्या शिळांवर फार मोठी एक भव्य शिळा ठेवलेली आहे. तिची लांबी चौदा फूट बाय सात फूट तर रुंदी सव्वा ते दीड फूट आहे. मांडवगोटा पाहिल्यावर, ती शेकडो टन वजनाची शिळा उचलण्याची त्या काळात कोणतीही साधने नसताना, त्यावर कशी उचलून ठेवली असेल असा प्रश्न पडतो. देशविदेशांतील संशोधकसंशोधनाच्या दृष्टिकोनातून मांडवगोटाला भेट देत असतात.
धर्मेंद्र कन्नाके यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे. ते चंद्रपूर येथे राहतात. त्यांना महाराष्ट्र शासनाचा 2015-16 सालचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे. 
————————————————————————————————————————————-

कोरंबी येथील शिलास्तंभाचा वरील भाग

डोंगरगाव येथील शिलास्तंभ
————————————————————————————————————–

5 COMMENTS

  1. मीपण महापाषाण युगीन ( Megalithic) हे funerary monuments/ structures, हे 'मेनहिर' व 'डोलमेन' फ्रान्समध्ये तसंच भारतात ( मेघालय आणि कर्नाटकात) बघितले आहेत. भारतातील या स्थळांचं photodocumentationपण केलं आहे. 'मेनहिर ' व ' दोलमेन' हे दोन्ही शब्द फ्रान्समध्ये असलेल्या 'ब्रतान्य' (Bretagne), इंग्रजीमध्ये 'Brittany', या प्रांताच्या भाषेतून घेतले आहेत. Menhir, Dolmen आणि यांचीच पुढची आवृत्ती म्हणजेच Tumulus. हा tumulusपण फ्रान्समध्ये बघितला आहे. खरंतर या कालावधीला 'महापाषाण युग' Megalithic Age हे नाव याच structuresवरून पडलं आहे.

  2. अभ्यासपूर्ण आणि परिसरातील वैविध्य मांडणारा लेख… कनाके यांनी विविध शीलारचनांचा अभ्यास बारकाईनं मांडल्याचे आढळून येते.

  3. सर खुप छान माहिती! मी लहानपणी भामरागडला वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने राहात असतांना लहान खेड्यातील माडिया जातीतील वस्तीत अशाच शिला गावाच्या शेजारी उभ्या स्थितीमध्ये मांडलेल्या दिसायच्या !त्याचा अर्थ आपल्या लेखामुळे कळला!धन्यवाद!!����

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here