थिंक विषयी (About Us)

0
53

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल दहा वर्षांपूर्वी सुरू झाले. मराठी माणसाचा चांगुलपणा व त्याची प्रज्ञाप्रतिभा याचे दर्शन घडवावेसमाजातील सत्शक्तीला चालना मिळावी व समाजात सांस्कृतिक प्रभावाचे विधायक वातावरण तयार व्हावे आणि त्या कारणे महाराष्ट्र भाषासंस्कृती सबळ व समृद्ध व्हावी हा पोर्टलचा हेतू आहे. थिंक महाराष्ट्र डॉट कॉमहा व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे चालवला जाणारा प्रकल्प आहे. ते ना नफा तत्त्वावर मुख्यत: देणग्यांमधून चालवले जाते. दिनकर गांगल हे वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.

          त्यासाठी थिंक महाराष्ट्र डॉट कॉमच्या जोडीला गरजेप्रमाणे अन्य माध्यमांचा उपयोग करावा असाही प्रयत्न असतो. सध्या भर माहिती संकलनावर आहे. तालुका हे केंद्र कल्पूनतालुक्यातील शंभर-सव्वाशे खेड्यांची माहिती सांस्कृतिक अंगाने जमा करावी असा प्रयास आहे. माहिती तीन प्रकारांत संकलित केली जाते – १. प्रत्येक गावातील कर्तबगार व छांदिष्ट व्यक्ती२. उपक्रमशील खासगी व सार्वजनिक संस्था आणि ३. मंदिर-मशिदीपासून वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांपर्यंतचे संस्कृतिसंचित यांची नोंद केली जाते. या प्रयत्नातून अंतिमत: पोर्टलवर महाराष्ट्राचे म्युझियम साकार होणार आहे. पण केवळ इतिहासात न रमता वर्तमानकाळात घडणाऱ्या उत्तम गोष्टींचा आढावा घ्यावा, त्यामधून उद्बोधक रसपूर्ण चर्चा घडाव्या आणि समाजातील बौद्धिकतेचे वातावरण जागते राहवे असा प्रयत्न असतो. ते स्वरूप जर्नलचे आहे. अशा तऱ्हेने थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेब पोर्टल हे एकाच वेळी महाराष्ट्राचे म्युझियम व समकालीन चर्चेचे जर्नल असे विकसित होत आहे.

          थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचा अनुभव असा आहेकी प्रत्येक तालुक्यात पंधरा-वीस व्यक्ती तरी वेगळे उपक्रमवेगळा विचार करणाऱ्या किंवा छंद जोपासणाऱ्या आढळतात. समाजात जे जे चांगले आहे ते नोंदले जावे असा ध्यास असतो. मीडिया बकाल झालेला असतानाती गोष्ट फार महत्त्वाची ठरते. खरा ठेवा मिळतो तो संस्कृतिसंचिताच्या शोधात. गावोगावी काय अपूर्व वास्तू आहेतकलाकार आहेतखाद्यपदार्थांचे नमुने आहेत आणि स्थानिक इतिहासाचा तर खजिनाच हाती लागतो! आमच्या नऊ-दहा वर्षांच्या अनुभवातून काही अपूर्व गोष्टी ध्यानी आल्या आहेत

·      थिंक महाराष्ट्र डॉट कॉम हा प्रकल्प गेली दहा वर्षें चालू आहे पण अपुऱ्या साधनसामग्रीमुळे त्यास मर्यादा खूप आहेतपरंतु महाराष्ट्र – भाषा व संस्कृती’ यांचा समग्रकोशच त्यातून उभा होत आहे. ते काम महादेवशास्त्री जोशी यांनी करून ठेवलेल्या ‘भारतीय संस्कृतिकोश’ या कामाच्या कितीतरी पुढे जातेकारण त्यास हजारो हात लागणार आहेत. ती किमया इंटरनेट माध्यमाची (क्राऊड सोअर्सिंग). त्यामुळे बारा कोटी महाराष्ट्रीयन लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकतात व नित्य संपर्कात राहू शकतात.

·      तो गावोगावची अस्मिता जपण्याचा व जागती ठेवण्याचा अभिनव व विधायक मार्ग आहे!

·      त्यामधून मल्टिमिडियाच्या अनेक शक्यता तयार होतात. जुनी पिढी वाचन एके वाचन अशी महती सांगत राहिलीत्यापुढे जाणे होते व म्हणून कालानुरूपता साधली जाते. थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमच्या प्रयत्नांत मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा होण्याची शक्यता दिसते. मराठी माणूस जात्या संकोचीप्रसिद्धीपराङ्मुख. त्यामुळे त्याची कामगिरी/कर्तबगारी जगापुढे येत नाहीचपरंतु त्याची त्यालाही कळत नाही. ‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशनच्या तालुकावार पाहणीत प्रत्येक तालुक्यात पंधरा ते पंचवीस माणसे विविध क्षेत्रांत असाधारण कामगिरी करतात असे दिसून आले. त्या सगळ्यांचे कर्तृत्व एकत्र प्रकट झाले तर मराठी माणसाचा आत्मविश्वास दुणावणार नाही का?

·      ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉमसारखा स्थानिक संस्कृतीचे जतन/संवर्धन करता करता जगाशी जोडून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न जगात अन्यत्र कोठे नाही. त्या अर्थाने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ लोकल व ग्लोबल या ‘ग्लोकल’ पेचावर उत्तम इलाजाचे ‘मॉडेल’ ठरू शकते!

         तुम्ही तुमचा व्हॉटस् अॅप नंबर कळवलात तर तुम्हाला ग्रूपमध्ये सामील होता येईल व व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या आणि थिंक महाराष्ट्र डॉट कॉमच्या घडामोडी नित्यनियमित कळत राहतील. 

– नितेश शिंदे 9323343406

 थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

——————————————————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here